ठळक बातम्या

विनामास्क फिरणाऱ्यांना मुंबई महापालिकेचा दणका : ३८ लाख नागरिकांवर कारवाई

६०० दिवसांत ७८ कोटींचा दंड वसूल
मुंबई – मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावणे पालिकेने बंधनकारक केले आहे; मात्र अजूनही सार्वजनिक ठिकाणी मास्कविना फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. पालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास एप्रिल २०२० पासून सुरुवात केली. यात २० एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तब्बल ३८ लाख ५७ हजार ४११ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पालिकेने केलेल्या ६०० दिवसांच्या या कारवाईतून तब्बल ७७ कोटी ५३ लाख ८३ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणेशोत्सवानंतर तिसऱ्या लाटेचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे; मात्र अजूनही अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करून विनामास्क फिरताना आढळून येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क लावणे आवश्यक असतानाही अनेकांकडून प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनात येत आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पालिकेने २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत भरारी पथके तैनात केली आहेत. पोलीस व रेल्वे प्रशासनाला विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …