विधान परिषद निवडणूक : मतदान केंद्रावर थांबण्यावरून वाद; बाजोरिया-माजी महापौरांत बाचाबाची

नागपूर – अकोला-वाशिम-बुलढाणा विधान परिषद निवडणुकीदरम्यान बाचाबाची झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यात बुथवर थांबण्यावरून ही बाचाबाची झाली आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा निवडणुकीदरम्यान ही बाचाबाची झाली. दोघांनाही शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रावर उपस्थित राहण्यावरून भाजपचे नगरसेवक विजय अग्रवाल आणि सेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. दरम्यान, यावेळी भाजपचे इतर नगरसेवक आणि आमदार रणधीर सावरकर हे अग्रवाल यांच्या बाजूने उपस्थिती झाले. मतदान केंद्रावर सुरू असलेला हा प्रकार शांत करण्यासाठी पोलिसांनी अतिशिघ्र दलास पाचारण केले. यानंतर भाजपचे आमदार सावरकर यांनी मध्यस्ती करीत वाद मिटविला. अतिशिघ्र दलाने इतर नगसेवकांना बाहेर काढले. दरम्यान, या घटनेमुळे मतदान केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती. अकोला, बुलढाणा आणि वाशिम या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपकडून वसंत खंडेलवाल हे दोन उमेदवार रिंगणात उभे आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …