विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा अवकाळी अवतरणार!

 

  • आयएमडीकडून ‘यलो अलर्ट’ जारी

मुंबई – भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी)वतीने राज्यात ऐन थंडीच्या मौसमात पुढील चार दिवसांत विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (डब्ल्यूडी) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याने महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत हलका ते मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ केला आहे.
उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम जाणवणार असून, येत्या ४ दिवसांत राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. ६ ते ९ जानेवारीदरम्यान विविध ठिकाणी पाऊस होणार आहे. हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आगामी ४ दिवसांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ ते ९ जानेवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नाशिक, अहमदनगर, ठाणे आणि पालघरमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्येही पाऊस हजेरी लावू शकतो, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना ८ जानेवारीला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. तर, ९ जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना यलो ॲलर्ट देण्यात आला. आगामी चार दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि आर्थिक संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने आणखी एकदा नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …