‘विटंबना छोटी गोष्ट! ‘ – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचेधक्कादायक विधान


बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलेआहे. विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी करून शिवप्रेमीच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केली आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंर्त्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीने जे केले, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेले, तर कारवाई ही होणारचं. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहेग़ृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही दिलेआहेत शिवाय बंगळुरूमध्ये जमावबंदीचे आदेश दिल्याची त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकच्या बंगळुरूमध्येछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. यानंतर ही घटना समोर आली आणि चौफेर या घटनेबाबत तीव्र पडसाद उमटू लागलेआहेत .या वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत, छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, अशा अर्थाचं विधान केल्यानं हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कर्नाटकातील पोलिसांना या संपूर्ण घटनेप्रकरणी कायद्याचे उल्लंघन करण्याचेआदेशही मुख्यमंर्त्यांनी दिलेत. त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांना या घटनेकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …