- तामिळनाडूला देणार आव्हान
जयपूर – ऋषी धवनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हिमाचल प्रदेशने शुक्रवारी येथे सवाई मानसिंह स्टेडियममधील सेमीफायनलमध्ये सैन्य संघाचा ७७ धावांनी पराभव करत विजय हजारे चषक स्थानिक वनडे चॅम्पियनशीपची फायनल गाठली. फायनलमध्ये त्यांचा सामना तामिळनाडूशी होणार आहे.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हिमाचल प्रदेशच्या कर्णधाराने ७७ चेंडूंत ८४ धावा करत मधल्या फळीचा डाव सावरला. अशाप्रकारे ते ६ बाद २८१ धावांचे महत्त्वपूर्ण लक्ष्य उभारू शकले. याचा पाठलाग करताना सैन्याचा संघ ४६.१ षटकांत २०४ धावांत गारद झाला, ज्यात धवनने ८.१ षटकांत २७ धावा देत ४ विकेटही मिळवल्या. त्याआधी धवनला आकाश वशिष्ठची चांगली साथ लाभली. धवनने आपल्या खेळीत नऊ चौकार व एक षटकार ठोकला, तर वशिष्ठने २९ चेंडूंत ४५ धावांच्या तुफान खेळीत चार चौकार व दोन षटकार ठोकले. दुसरीकडे, सैन्याच्या वतीने कर्णधार रजत पालिवालने ६६ चेंडूंत ५५ धावांची अर्धशतकीय खेळी केली. पण त्याची ही खेळी संघाला फायनलचे तिकीट मिळवून देण्यास अपयशी राहिली.
One comment
Pingback: 늑대닷컴