जयपूर – तामिळनाडूचा बळकट संघ रविवारी येथे पार पडणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी राष्ट्रीय वनडे क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध जेतेपदाच्या प्रबळ दावेदाराच्या रूपात मैदानात उतरेल. दुसरीकडे, हिमाचल संघ आपल्या पहिल्या जेतेपदाच्या प्रयत्नात घाम गाळताना दिसेल. ऋषी धवनच्या नेतृत्वातील हिमाचल संघाने सेमीफायनलमध्ये सैन्य संघाचा ७७ धावांनी पराभव केला, तर तामिळनाडूने अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक सामन्यात सौराष्ट्रचा दोन विकेटने पराभव केला. या सत्राच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धा जिंकणारा तामिळवाडू संघ विजय हजारे ट्रॉफी जिंकत दुसरे जेतेपद प्राप्त करण्यास वचनबद्ध असेल. तामिळनाडू संघाने आतापर्यंत खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली. बाबा अपराजितने दक्षिण आफ्रिकेतील भारत ‘ए’ दौऱ्यातून परतल्यानंतर चांगला खेळ दाखवला. कर्नाटकविरुद्ध शतक ठोकणारा एन. जगदिशन मागील सामन्यात अपयशी राहिला, जो येथे मोठी खेळण्याचा प्रयत्न करेल. या फलंदाजी क्रममात अपराजितचा जुळा भाऊ व मागील सामन्यात अर्धशतक ठोकणारा बाबा इंद्रजीत, कर्णधार विजय शंकर, अनुभवी दिनेश कार्तिक, आक्रमक फलंदाज शाहरूख खान व वॉशिंग्टन सुंदर यांचा क्रमांक येतो. वॉशिंग्टनने सेमीफायनलमध्ये ७० धावांची शानदार खेळी केली. हिमाचलची कमी अनुभवी गोलंदाजी आक्रमणासमोर तामिळनाडूचे फलंदाज वरचढ वाटत आहेत. तामिळनाडूचे तीन फिरकीपटू साई किशोर, एम. सिद्धार्थ व वॉशिंग्टन यांचा सामना करणे देखील हिमाचलच्या फलंदाजांसाठी सोपे नसेल. हिमाचलसाठी कर्णधार ऋषी धवनची कामगिरी खूप महत्त्वाची ठरेल. जर त्यांच्या संघाला जर पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकायची आहे, तर धवनला फलंदाजी व गोलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. हिमाचल संघ प्रशांत चोप्राच्या फॉर्मने आनंदी असतील, ज्याने क्वार्टर फायनल व सेमीफायनलमध्ये मॅच विजेता खेळी (अनुक्रमे ९९ व ७८ धावा) केलेली. चोप्रा फायनलमध्ये ही आपली हिच लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. हिमाचलच्या इतर फलंदाजांत शुभम अरोरा, दिग्विजय रांगी, अमित कुमार व आकाश वशिष्ट यांना खेळपट्टीवर सावरून खेळी करावी लागेल. हा सामना सकाळी नऊ वाजता सुरू होईल.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …