ठळक बातम्या

विजय हजारे ट्रॉफीत पाच गोलंदाजांची हवा

मुंबई – स्थानिक क्रिकेट टुर्नामेंटमधील एक महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारताचे युवा फलंदाज आणि गोलंदाज धमाकेदार कामगिरी करीत आहेत. फलंदाजांमध्ये ऋतुराज गायकवाड दमदार फलंदाजी करीत असून, गोलंदाजीमध्ये पाच गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली आहे. यामध्ये स्टार स्पिनर युझवेंद्र चहल टॉपवर आहे. या टुर्नामेंटमध्ये हरियाणाकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलने पाच सामन्यांत १४ विकेट्स मिळवल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये चहल अव्वलस्थानी आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय संघात चहलची निवड जवळपास निश्चित झाली आहे.
या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे यश ठाकूर. विदर्भाचा हा गोलंदाज आतापर्यंत पाच सामन्यांत १४ विकेट्स मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
राजस्थानकडून खेळणाऱ्या अनिकेत चौधरीने पाच सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या चिंतन गाझाने पाच सामन्यांत १३ बळी घेतले असून, त्याची गोलंदाजी यंदा अप्रतिम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघातील युवा खेळाडू वॉशिंगटन सुंदर तामिळनाडू संघाकडून खेळत आहे. त्याने पाच सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment