विजय हजारे ट्रॉफीतही ऋतु’राज’: सलग तिसऱ्या सामन्यात झळकावले शतक


मुंबई – आयपीएलमध्येचेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून तुफानी फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडनेविजय हजारेट्रॉफीत चमकदारी कामगिरी सुरु ठेवत सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्रसंघाचं नेतृत्व करणाऱ्या ऋतुराजनेसलग तीन सामन्यात शतक झळकावले. त्यानं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केरळच्या संघाविरुद्ध हा पराक्रम केला.
विजय हजारे स्पर्धेत ऋतुराज पहिल्यांदाच महाराष्ट्राचं नेतृत्व करीत आहे. कर्णधार म्हणून ऋतुराजने गेल्या दोन सामन्यात महाराष्ट्राला विजय मिळवून दिला आणि शतकासह विजयाच महत्त्वाचा वाटा देखील उचलला आहे. ऋतुराजचेविजय हजारे स्पर्धेतील गेल्या तीन सामन्यात शतक केले. त्यानं मध्य प्रदेशविरुद्ध ११२ चेंडूत १३६ धावा केल्या आणि छत्तीसगड विरुद्ध नाबाद १५४ धावांची खेळी केली, तर केरळविरुद्धच्या सामन्यात त्याने १२४ चेंडूत १२९ धावा केल्या. यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. भारताचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल २०२१ मध्येचेन्नईच्या संघाकडून खेळताना त्याने सर्वाधिक ६३५ धावा केल्या होत्या. चेन्नईच्या विजयात ऋतुराजची महत्वाची भूमिका होती. त्यानं फाफ डुप्लेसिस सोबत चेन्नईला चौथे विजेतेपद मिळून देण्यात मोठा हातभार लावला. यामुळेच चेन्नईच्या संघाने ऋतुराजला पुढील हंगामासाठी रिटेन देखील केलेआहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …