थुंबा – शम्स मुलानीच्या नेतृत्वाखाली मुंबईसंघाने विजय हजारे करंडक स्पर्धेमध्येदुसऱ्या सामन्यात विजयाचेखातेउघडले. बडोद्याने प्रथम फलंदाजी करत विष्णू सोलंकीच्या (९४) खेळीवर ४९.१ षटकात सर्व बाद २१० धावा उभारल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या मुंबईकडून यशस्वी जयस्वाल (नाबाद ४१) आणि अरमान जाफर (२१) यांनी सलामीसाठी ४६ धावा जोडल्या. हार्दिक तोमर (३) बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव खेळण्यास उतरला.३ चौकारांनी त्याने१४ धावा काढल्या, पण तो फारकाळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही. २३ व्या षटकात मुंबईने ३ बाद १०० धावांपर्यंत मजल मारल्यावर पावसाने हजेरी लावली. त्यामुळेपंच अधिकाऱ्यांनी डकवर्थलुईस नियमाचा आधार निर्णय घेतला.त्यानुसार मुंबईला विजयासाठी २३ षटकांत ८८ धावांचेलक्ष्य मिळणार होते, परंतु मुंबईने त्यापूर्वीच आव्हान ओलांडले होते. त्यामुळे मुंबईला १३ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.मुंबईची धावगती सरस असल्यामुळेडकवर्थलुईस नियमानेविजयाचेदान मुंबईच्या झोळीत टाकण्यात आले. सलामीच्या सामन्यात मुंबईला ५४ धावांनी तामिळनाडूने पराभूत केले होते.
तत्पूर्वी, मुंबईकडून तनुष कोटियन व प्रशांत सोलंकी यांनी अनुक्रमे ३ बळी घेतले,तर या दुकलीला साथ देत कर्णधार मुलानीने अष्टपैलू चमक दाखवत दोन फलंदाजांना माघारी धाडले.अनुभवी धवल कुलकर्णी व तुषार देशपांडे यांना केवळ एका बळीवर समाधान मानावे लागले. बडोद्याकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या सोलंकीच्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तळाच्या फलंदाजांमुळे बडोद्याचेद्वीशतक धावफलकावर लागले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …