ठळक बातम्या

विजय देवरकोंडाने शेअर केला माईक टायसनसोबतचा फोटो

तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा बऱ्याच काळापासून आपला आगामी चित्रपट लायगरमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारत असलेला विजय जगातील प्रख्यात हेवीवेट चॅम्पियन बॉक्सर माईक टायसनसोबत फायटिंग करताना दिसणार असल्याची चर्चा नुकतीच रंगली होती. आता बहुधा विजय देवरकोंडाने माईकबरोबर शूटिंग सुरू केले आहे. विजयने आपल्या सोशल मीडिया पेजवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत माईक हसताना दिसून येत आहे, तर बॅकग्राऊंडमध्ये विजय देवरकोंडा पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करताना विजयने लिहिले आहे, ‘हे माणूस प्रेम आहे. प्रत्येक क्षणाला आठवणी बनवत आहे आणि ही आठवण नेहमी खास ठरेल. लायगर व्हर्सेस द लेजेंड. जेव्हा मी माईक टायसन यांचा सामना केला.’

माईक टायसन हा जगातील सर्वात वादग्रस्त ठरलेला बॉक्सर आहे. माईक टायसनवर एकदा रेपचा आरोपही लावण्यात आला होता, ज्याकरिता त्याला तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. १९९७मध्ये माईक तेव्हा चर्चेत आला होता, जेव्हा बॉक्सिंग रिंगमध्ये त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा कान चावला होता.
लायगरमध्ये विजय देवरकोंडाच्या अपोझिट अनन्या पांडे दिसून येणार आहे. हा चित्रपट साऊथचे प्रख्यात दिग्दर्शक पुरी जगन्नाथ दिग्दर्शित करणार आहेत. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची प्रतिक्षा केवळ साऊथ मध्येच नाही, तर उत्तर भारतातही होत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …