ठळक बातम्या

विजय दहिया लखनऊ फ्रँचायजीचे सहाय्यक प्रशिक्षक

नवी दिल्ली – माजी यष्टीरक्षक फलंदाज विजय दहिया यांची आयपीएल २०२२ आधी बुधवारी लखनऊ फ्रँचायजीच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. हरियाणाचे राहणारे ४८ वर्षीय दहिया उत्तर प्रदेश संघाचे सध्याचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी याआधी दोन वेळा आयपीएल जिंकणारा संघ कोलकाता नाइट रायडर्सच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या रूपात काम पाहिले आहे. त्यांनी दिल्ली रणजी संघाला प्रशिक्षण देण्याशिवाय दिल्ली कॅपिटल्सच्या ‘प्रतिभावंत शोध’ मोहिमेसाठी ‘टॅलेंट स्काऊट’च्या रूपात काम केले. भारताच्या वतीने दोन कसोटी व १९ वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे दहिया म्हणाले की, लखनऊ आयपीएल फ्रँचायजीसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबाबत आनंदी असून मी आभारी आहे. लखनऊ संघ आरपीएसजीच्या समूहाचा भाग आहे. त्यांनी अगोदरच अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षकपदी तर गौतम गंभीर यांची मेंटर (मार्गदर्शक)च्या रूपात नियुक्ती केली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …