‘विक्रम वेधा’ तील हृतिकचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता हृतिक रोशन याने १० जानेवारी रोजी आपला ४८ वा जन्मदिवस साजरा केला. आपल्या जन्मदिनी हृतिकने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे, जी पाहिल्यानंतर त्याचे चाहते नक्कीच उत्साहित होतील.
हृतिक रोशनने आपल्या जन्मदिनी आपला बहुचर्चित चित्रपट ‘विक्रम वेधा’तील त्याचा फर्स्ट लूक रिलीज केला, ज्यात तो एका वेगळ्या अवतारात दिसून येत आहे. हृतिकने ‘विक्रम वेधा’शी संबंधित आपला फर्स्ट लूक अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने जो फोटो शेअर केला आहे. त्यावरून ‘विक्रम वेधा’मध्ये हृतिकच्या व्यक्तिरेखेचे नाव वेधा आहे. तो यात निळ्या रंगाच्या प्रिंटेड कुर्त्यामध्ये दिसून येतोय. रक्ताने माखलेल्या हृतिकच्या चेहऱ्यावर त्याचा ग्रे शेड लूक खुलून दिसतो. फोटोत हृतिकने सनग्लासेसही घातले आहे. ‘विक्रम वेधा’शी निगडित हृतिकचा हा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हृतिकचा हा लूक त्याच्या चाहत्यांना आणि अनेक सोशल मीडिया युझर्सना खूप पसंत पडत आहे. त्यावर ते कमेंट देतानाही दिसून येत आहेत. ‘विक्रम वेधा’ हा २०१७ मध्ये आलेला आर.माधवन आणि विजय सेतुपती यांच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …