ठळक बातम्या

विक्की कौशलने शेअर केला इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्सचा फर्स्ट लूक

अभिनेता अजय देवगण याच्या इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्सच्या एपिसोडला मिळालेल्या तुफान यशानंतर आता सोमवारी डिस्कव्हरी प्लसने आपला बहुप्रतिक्षित शो इन टू द वाइल्ड विक्की कौशलचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. हे पोस्टर विक्कीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यात विक्की कौशल आणि बेअर ग्रिल्स एकत्र उभे असलेले दिसून येत आहेत.

हे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘सर्व्हायव्हल एक्स्पर्ट बेअर ग्रिल्ससोबत आयुष्यभराचा रोमांच! या पहा, त्यांनी माझ्याकरिता कोणती योजना बनवली आहे.’ दरम्यान विक्कीने पुढे या शोच्या प्रिमिअरची माहिती देताना म्हटले की, इन टू द वाइल्डचा प्रिमिअर येत्या १२ नोव्हेंबर रोजी डिस्कव्हरी प्लसवर होईल. हा एक असा शो आहे ज्यात लोकांना जंगलात अडकून पडल्यानंतर जगण्यासाठी सोप्या मार्गांची माहिती दिली जाते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …