विंडीज टीममधील पाच जणांना कोरोना

लाहोर – पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील पाच जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे पाचही जण सध्या आयसोलेशन म्हणजेच विलगीकरणामध्ये आहेत. या पाच जणांपैकी तीन खेळाडू आहेत. विकेट किपर, फलंदाज शाही होप, स्पिनर अकिल हुसेल आणि ऑल राऊंडर जस्टीन ग्रेव्हीस या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोचिंग स्टाफमधील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत हे खेळाडू आता सहभागी होणार नाहीत. याआधी शेल्डन कॉट्रेल, रोस्टन चेस आणि काईल मेयर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने ट्विट करून या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली. वेस्ट इंडिजचे प्रमुख खेळाडू कोरोना बाधित आहेत, त्यामुळे वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजने पाकिस्तानपुढे आधीच शरणागती पत्करली आहे. पाकिस्तान टी-२० मालिकेत २-०ने आघाडीवर आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात ६३ धावांनी तर दुसऱ्या सामन्यात ९ धावांनी विजय मिळवला होता. वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन वन-डे सामन्यांची मालिका शनिवार (१८ डिसेंबर) पासून सुरू होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …