ठळक बातम्या

वाशिममध्ये अवकाळी पावसाचा पिकासह फळ बागांना फटका

वाशिम – जिल्ह्यातील कामरगाव, धनज बुद्रुकसह परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बीतील गहू, हरभरा, तूर भाजीपाला पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. भाजीपाला पिकासोबतच तूर, गहू, हरभरा, संत्री पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याला मदत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे धनज परिसरात रब्बीतील पिकासह संत्रा बागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजावर पुन्हा संकट आले आहे. जिल्ह्यात अनेक शेकडो हेक्टरवर परिमाण झाला. मात्र, प्रशासनाच्या वतीने अजून पंचनामे सुरूच केले नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …