ठळक बातम्या

वारजे-माळवाडीत उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी

५२ लाखांचे विदेशी मद्य जप्त; एकाला अटक
पुणे – शहरातील वारजे-माळवाडी परिसरात छापेमारी करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५२ लाखांचे विदेशी मद्य जप्त केले आहे. या परिसरातून विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची टीप उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर वाहनावर छापेमारी करीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कृ ष्णा तुळशीराम कांदे (३०, मु. आंबील वडगाव, पो. पाथेरा, ता. बीड) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
उत्पादन शुल्क विभागाला गोवा राज्य विक्रीचा परवाना असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने आयशर (एमएच-०९, एफएल-२९४८) या गाडीवर छापा टाकला. त्यातून वेगवगेळ्या विदेशी मद्याचे एकूण ४५० बॉक्स व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. यावेळी विभागाने एकूण ५२ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही क ारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उपाम, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, पुण्याचे अधीक्षक संतोष झगडे, बीडचे अध्यक्ष नितीन घुले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …