वारकºयांच्या दिंडीत गाडी शिरल्याने भीषण अपघात

३0 जण जखमी, २ ठार

पुणे – आळंदीच्या दिशेने कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त, पायी निघालेल्या वारकºयांच्या दिंडीत पिकअप गाडी शिरल्याने भीषण अपघात घडला आहे. कान्हे फाटा येथे कामशेत (साते) गावाजवळ वाहनाची जोरदार धडक बसून, या दु:खद घटनेत ३0 वारकºयांना गंभीर इजा झाली आहे,तर दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्या कडेने पायी जात होते. त्यावेळी जवळून जाणाºया पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वारकºयांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली. यात ३0 वारकरी जखमी झाल्याची तर दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तपास अधिकारी वडगाव मावळचे पोलीस उपनिरीक्षक चामे यांनी दिली.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …