नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ८३ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मल्टी स्टारर चित्रपटात अभिनेत्री वामिका गब्बीनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. हिंदी सिनेमापासून पंजाबी आणि साऊथ चित्रपटात काम केलेली वामिका ८३मध्ये माजी क्रिकेटर मदनलालची पत्नी अनु लालच्या भूमिकेत दिसून येत आहे. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी वामिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत वामिकाने दीपिकाबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला आहे.
वेस्ट इंडिजचे चाहते तुला बुली करतात आणि तू रडत हॉटेल रूममध्ये जाते तो सीन चित्रीत करणे किती अवघड होते?, असा प्रश्न वामिकाला करण्यात आला असता ती म्हणाली, ‘स्टेडिअमवाला सीन आम्ही लंडनमध्ये शूट केला होता आणि दीपिकासोबतचा हॉटेल रूमवाला सीन मुंबईत शूट झाला होता. साधारणत: मी जेव्हा ॲक्टर म्हणून काहीही शूट करत असेल, तर मी आधी व्यक्तिरेखेचा विचार करते. परंतु येथे मी जी भूमिका साकारत होते ती खरी होती. ते वास्तव आयुष्यात घडले होते. ते परफॉर्म करण्याचा नर्व्हसनेस वेगळाच होता. हे लोक ती परिस्थिती खरेच जगले आहेत आणि आम्ही ते ॲक्ट करत आहोत. ज्यावेळी तो सीन वेस्ट इंडिज फॅन बनलेल्या महिलेसोबत शूट होत होता तेव्हा खरे सांगायचे, तर ती अभिनेत्री खूप गोड होती. परंतु रोमी देव आणि अनु लालसोबत जेव्हा हे प्रत्यक्षात घडत होते, तेव्हा ते किती लाजिरवाणे आणि भावुक होते. म्हणजे तुम्ही तणावात आहात आणि कोणीतरी तुमची चेष्टा करतेय. अनु ही जी माझी व्यक्तिरेखा आहे ती रडते. जेव्हा मला अनुबद्दल सांगण्यात आले होते, तेव्हा अनु लाल वर्ल्ड कपदरम्यानच प्रेग्नंट होती, असेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे ती जास्त इमोशनल असणार आणि तिचे सतत मूड स्विंग होत असणार हे मला ठाऊक होते. त्यामुळे ही भूमिका साकारताना खूप मजा आली. त्याचबरोबर दीपिकासोबतचा हॉटेलमधील सीन करतानाही खूप मजा आली होती. जेव्हा आपल्याला कळते की, भारत जिंकत आहे, तेव्हा तो आनंद काही औरच असतो. म्हणजे त्याच वेस्ट इंडिज स्त्रियांचे चेहरे टीव्हीवर दिसत होते आणि आम्ही दोघी दुसरीकडे खिदळत होतो. विचार करा मी आणि दीपिका पलंगावर उड्या मारत आहे. तेथेच डान्स करत आम्ही त्या लोकांना चिडवत होतो आणि हे सर्व खूप मजेदार होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: 뉴토끼