ठळक बातम्या

वानखेडेंनी पहिल्या पत्नीला दिली तुरुंगात टाकण्याची धमकी – नवाब मलिकांचा दावा

मुंबई- एनसीबीचेमुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांची खासगी माहिती उघड करण्याचा धडाका अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी सुरुच ठेवले आहे. गुरुवारीही पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंविषयीचा आणखी एक दाखला आणि मोठा गौप्यस्फोट मलिकांनी केला आहे. ज्या मुलीशी लग्न करुन घटस्फोट दिला. वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी समोर येऊन समीर वानखेडेंचं सत्य समोर आणेल. या भितीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्या मुलीच्या मामेभावाजवळ ड्रग पोहोचवण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारची एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्याचं कटकारस्थान रचलं. आजही तो मुलगा तुरुंगात आहे. त्याला अडकवल्यानंतर त्याला समीर वानखेडे धमकी देत होते. जर माझ्याविरोधात बोलण्यासाठी तुम्ही समोर आले, तर संपूर्ण कुटुंबाला मी तुरुंगात टाकेल. अशी दहशत यांनी निर्माण केली होती, असा दावा मलिकांनी केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …