वानखेडेंकडून पालिकेच्या कागदपत्रात खाडाखोड – नवाब मलिक

मुंबई – एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कागदपत्रात खाडाखोड करून १९९३ साली दस्तावेज बदलले, तसेच तेथील रजिस्टरही गहाळ केले, परंतु वानखेडे यांना हे माहिती नाही की, मुंबई महापालिकेने त्यांचे दस्तावेज स्कॅन करून ठेवले होते. आज ते महानगरपालिकेचा संगणकीय दाखला दाखवत आहेत; पण आम्ही महापालिकेची मूळ कागदपत्रे न्यायालयासमोर ठेवणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वानखेडे यांच्या वडिलांनी माझ्यावर सव्वा कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. ट्विट करण्यापासून रोखावे, अशी मागणीही त्यांनी न्यायालयात केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आमदार आणि एका पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता असल्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन पाहायला हवे, असे निरीक्षण नोंदवले होते. यानंतर आम्ही या प्रकरणात आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेचे सर्व अभिलेख आम्ही तपासले आहेत.
वानखेडे यांनी ज्या मुलीला घटस्फोट दिला, ती मुलगी आपल्याविरोधात कधीही उभी राहू शकते या भीतीपोटी मुलीच्या चुलत भावाकडे एका ड्रग्ज पेडलरकडून ड्रग्ज ठेवून फसवण्यात आले. राज्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकामार्फत मुलीच्या भावाला अटक करण्यात आली, तसेच आमच्याविरोधात साक्ष दिली, तर संपूर्ण कुटुंबाला ड्रग्ज पेडलर बनवून तुरुंगात टाकू, अशी धमकी दिल्याचे मलिक म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …