वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

  •  पंतप्रधान कार्यालयाची माहिती
  • पुणे मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १८ जानेवारीला पुणे येथे संभाव्य दौरा होणार होता, मात्र हा संभाव्य दौरा आता रद्द करण्यात आला आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे प्रशासनाला देण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे पुणे मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर पडणार, असे सध्या तरी चत्रि आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोचे उद्घाटन करणार होते. त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरणदेखील त्यांच्या हस्ते होणार होते, तसेच त्यांच्या हस्ते दिवंगत ज्येष्ठ व्यंगचत्रिकार आर. के. लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या कलादालनाचे उद्घाटन होणार होते. या सर्व घडामोडीनंतर ते सम्बिायोसिस वद्यिापाठीशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याकडून पंतप्रधानांचा संभाव्य दौरा होणार नसल्याचे कळवण्यिात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …