सोनी सबवरील मालिका वागले की दुनिया – नयी पिढी, नये किस्से तीन विभिन्न पिढ्यांच्या मनोरंजनाच्या गरजांची पूर्तता करत सकारात्मक, हलक्या-फुलक्या व संबंधित कथानकासह भारताची सर्वात लोकप्रिय मालिका बनली आहे. मालिका सर्वत्र आनंद पसरवण्यासोबत सर्वांमध्ये आशा जागृत करण्यामध्ये मदत करते. उत्सवाच्या उत्साहामध्ये अधिक भर टाकत आणि मालिका वागले की दुनियाच्या अद्भूत व प्रेमळ टीमप्रती आभार व्यक्त करत सर्व कलाकारांनी टीमला सरप्राइज दिले. त्यांनी मोठे योगदान देत एक रक्कम गोळा केली आणि टीम सदस्यांना आवश्यक घरगुती सामान व उपकरणे देत मालिकेप्रती ते देत असलेले योगदान व समर्पिततेसाठी त्यांचे आभार मानले. या खास गेस्चरने निश्चितच सणासुदीचा काळाच्या सकारात्मक उत्साहाला अधिक पुढे नेले. राजेश वागलेची भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्हणाले, दिवाळी या सणादरम्यान सर्व जण एकत्र येतात आणि काम व इतर तणाव विसरून उत्साहात सण साजरा करतात. दिवाळी पार्टी सीन व संवाद योग्यरित्या होण्याची चिंता न करता एकमेकांशी संलग्न होण्यासाठी परिपूर्ण क्षण होता. आमची टीम दिवस-रात्र काम करते आणि नेहमीच मालिकेला यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. आमची त्यांच्यासाठी काही तरी करण्याची इच्छा होती आणि दिवाळी पार्टी अगदी योग्यवेळी आली. आम्ही सर्वांनी त्यांनी आमच्यासाठी केलेल्या गोष्टींप्रती आभार मानण्यासाठी गिफ्ट्स देण्याचे ठरवले. मागील दीड वर्ष सर्वांसाठी तणावपूर्ण राहिले आहे. आमची टीम आमच्यासाठी दुसऱ्या कुटुंबासारखी आहे, म्हणून यंदा दिवाळीला त्यांच्यासाठी काही तरी खास करणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. मी आशा करतो की, आम्ही त्यांना आनंदित केले असेल. वंदना वागलेची भूमिका साकारणाऱ्या परिवा प्रणती म्हणाल्या, दिवाळीची खासियत म्हणजे एकत्र येऊन सण साजरा करणे, आपल्या आवडणाऱ्या लोकांचे ऋण फेडणे आणि आपली कृतज्ञता व्यक्त करणे. वागले की दुनिया उत्तम कामगिरी करत असल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. सर्व जण आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे खूपच हृदयस्पर्शी आहे. प्रेक्षक अनेकदा पडद्यामागील हिरोज म्हणजेच आमचे अद्भूत टीम सदस्य यांना विसरून जातात, म्हणून आम्ही ते करत असलेल्या अथक मेहनतीसाठी त्यांचे आभार म्हणून त्यांच्याकरिता काही तरी करण्याचे ठरवले, कारण कधी-कधी त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जाते. आमचा यंदा दिवाळीला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा आणि जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मनसुबा होता.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …