* अश्विनी पोनप्पा – एन सिक्की रेड्डीचेआव्हान संपुष्टात
बाली – बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्येभारतीय बॅडमिंटनपटूकिदाम्बी श्रीकांतनेविजयी सलामी दिली आहे.श्रीकांतनेपहिल्या सामन्यात फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हचा सरळ सेटमध्येपराभव केला. २०१४ साली याच स्पर्धेच्या नॉकआऊट फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या श्रीकांतने यावेळी केवळ ४२ मिनिटात पोपोवको चा २१-१४, २१-१६ असा धुव्वा उडवला. या विजयासह श्रीकांतनेस्पर्धेच्या ब गटाच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली.आता त्याचा सामना तीन वेळा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या थायलंडच्या कुनलावूत विटीदासर्नशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत ३३ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूला पराभूत करून माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू श्रीकांतने जबरदस्त खेळ दाखवला. सुरुवातीस पहिला गेम बरोबरीत होता पण ब्रेकपर्यंत श्रीकांतने ११-९ अशी आघाडी घेतली. यानंतर सलग पाच गुण घेत स्कोअर १६-१० केला आणि नंतर गेमही जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तो १-४ ने पिछाडीवर पडला होता, पण लवकरच पुनरागमन करून ब्रेकपर्यंत त्याने दोन गुणांची आघाडी घेतली. ही वाढ पुढे १४-९ पर्यंत नेली आणि सहज गेम जिंकला. श्रीकांतनेटोमाच्या लाँग शॉटमधून चार मॅच पॉइंट मिळवले.
दुसरीकडे, महिला दुहेरी गटात अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरेजावेलागले.जपानच्या द्वितीय मानांकित नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा या जोडीनेभारतीय महिला जोडीचा १४-२१, १८-२१ असा पराभव केला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …