वरुण धवन आणि कियारा अडवाणीने आटोपले जुग जुग जियोचे शूटिंग

अभिनेता वरुण धवन आपल्या लूक आणि धमाकेदार अंदाजामुळे कायम चर्चेत असतो. त्याचबरोबर तो आपल्या आगामी चित्रपटांविषयीचे अपडेटदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता वरुणने माहिती दिली आहे की, त्याने आपला आगामी चित्रपट जुग जुग जियोचे शूटिंग पूर्ण केले आहे.

वरुणने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबर उभा असलेला दिसून येतोय. या मोनोक्रोम फोटोमध्ये कियारा आणि वरुण धवन एका बाल्कनीमध्ये एकत्र उभे राहून पोझ देताना दिसून येत आहेत. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना वरुणने लिहिले आहे, ‘एकच बाल्कनी होती आणि आम्ही आमच्या अखेरच्या शेड्यूलची प्रतीक्षा करत आहोत, कारण आम्ही हे शेड्यूल पूर्ण करत आहोत.’ दरम्यान या चित्रपटातील आपल्या सह कलाकारांची आठवण काढताना वरुणने पुढे लिहिले, ‘अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉलची आठवण काढत आहोत.’ तर अभिनेत्री कियारा अडवाणीनेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे व कॅप्शन लिहून सांगितले आहे की, ती पुढील शेड्यूलची प्रतीक्षा करत आहे.’ राज मेहताद्वारे दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन आणि कियारा अडवाणी लीड रोलमध्ये दिसून येणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …