वरवरा राव यांना ५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

मुंबई – वरवरा राव यांना भीमा-कोरेगाव, एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी एनआयएने अटक केली होती. उच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या तसेच डॉक्टरांमध्ये होत असलेल्या कोरोनाचा संसर्ग या कारणांमुळे पुन्हा वरवरा राव यांना दिलासा दिला असून, त्यांना आत्मसमर्पण करण्याची मुदत ५ फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

आजारपणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात वरवरा राव यांना कडक अटी शर्तींवर अंतरिम जामीन मंजूर केला. त्यावेळी वैद्यकीय जामिनाचा कालावधी संपण्यापूर्वी शरण येण्याचे निर्देश दिले होते. वरवरा राव सध्या मालाड येथे भाड्याने राहत असून, पुढील उपचारांचा खर्च त्यांना परवडत नसल्याने त्यांना हैदराबाद येथील निवासस्थळी जाण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच राव यांचा जामिनाचा अवधीही वाढविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका राव यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगावमध्ये हिंसाचार झाला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यादरम्यान अनेक वाहनेही जाळली गेली. वरवरा राव हे तेलुगू डाव्या विचारसरणीचे कवी आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते त्यांच्या क्रांतिकारक कवितांसाठी ओळखले जातात. ते तेलुगू साहित्याचे प्रख्यात मार्क्सवादी समिक्षक मानले जातात. राव अनेक दशकांपासून अनेक विद्यार्थ्यांना या विषयावर शिकवत आहेत. राव हे वीरसमचे (क्रांतिकारक लेखक संघटना) संस्थापक सदस्यदेखील आहेत.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …