वरळी गॅस सिलिंडरचा स्फोट

‘त्या’ ४ महिन्यांच्या बाळाचा अखेर मृत्यू

मुंबई – वरळी येथील एका घरात मंगळवारी सिलिंडरचा स्फोट हाऊन आगीच्या भडक्यात ४ जण होरपळले होते, ज्यात ४ महिन्यांचा बाळाचा देखील समावेश होता. नायर रुग्णालयात उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. आता या आगीतील तीन जखमींना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दक्षिण मुंबईतील वरळी येथील गणपतराव जाधव मार्गावर असलेल्या कामगार वसाहतीतील बीडीडी चाळ क्रमांक-३मधील एका घरात सकाळी हा स्फोट झाला. या स्फोटानंतर घरात आग पसरली. या आगीत आनंद पुरी (२७), मंगेश पुरी (४ महिने), विद्या पुरी (२५), विष्णू पुरी (५) जखमी झाले होते. यातील ४ महिन्यांचे बाळ आणि आनंद पुरी यांची प्रकृती गंभीर होती. त्यापैकी बुधवारी मंगेश पुरी या ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. तर, या आगीत जखमी विद्या पुरी आणि विष्णू पुरी या दोघांची प्रकृती स्थिर आहे. वरळी येथील कामगार वसाहत येथे असलेल्या बीबीडी चाळ क्रमांक-३ मधील एका घरात मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांच्या सुमाराला स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर घराला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …