ठळक बातम्या

वयाच्या 25 व्या वर्षी ॲक्टींग सोडण्याचा विचार करतोय टॉम हॉलंड


हॉलीवूड अभिनेता टॉम हॉलंड सध्या आपला आगामी चित्रपट स्पायडरमॅन नो वे होम’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना टॉमने तो आता ॲक्टींग लाईन सोडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.
अभिनयासंदर्भातील चिंतांबद्दल बोलताना टॉम म्हणाला की त्याने आपल्या आयुष्यात खूप कमी वयामध्ये अभिनयाला सुरुवात केली होती. आणि त्यामुळेच त्याला अन्य काही करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता अभिनय सोडून अन्य काही तरी करण्याचा टॉमचा विचार आहे.
टॉम म्हणाला,’ मला हे बिल्कुल ठाऊक नव्हते की मला अभिनेता बनायचे की नाही ते. मी वयाच्या 11 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात एंट्री केली होती. त्यामुळे मी दुसरे काही केले नाही. त्यामुळे मला आता जायचे आहे आणि अन्य काहीतरी करायचे आहे. मला खरेच ठाऊक नाहीय की वयाच्या 25 व्या वर्षी हे असे का होतेय.
कमी वयात ॲक्टींगची दुनिया सोडणारा टॉम हा काही पहिला अभिनेता नाहीयं. यापूर्वी 2014 मध्ये गेम ऑफ थ्रोन्सचे स्टार जॅक ग्लीसनने देखील ॲक्टींगच्या दुनियेला टा टा बाय बाय केले होते. त्यावेळी त्याने सांगितले होते की तो वयाच्या आठव्या वर्षापासून अभिनय करत होता आणि तो जितके काम करत होता तितकी त्याची या कामातील रुची कमी होत चालली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …