ठळक बातम्या

वयाच्या ७७व्या वर्षी तो जाऊ लागला शाळेत

लिहिण्या-वाचण्याचे वय नसते, असे म्हणतात. माणसाला जेव्हा कधी शिकावेसे वाटेल वाचायचे असेल, तेव्हा तो ते सुरू करू शकतो. या गोष्टीचे एक उदाहरण नुकतेच दिसून आले. ब्राझीलमध्ये राहणाºया ८१ वर्षांच्या आजोबांनी शिकायला सुरुवात केली. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली आणि लहान मुलांसोबत वर्गात अभ्यास केला. घरच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना लहानपणीच शाळा सोडावी लागली होती; पण आता त्यांनी पुन्हा शिकायला सुरुवात केली आहे.
गुडन्यूज करस्पाँडंट नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांची ही कथा शेअर करण्यात आली आहे. परिस्थितीमुळे वयाच्या ९व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडले होते, परंतु त्यांना वाचनाची आणि लेखनाची नेहमीच आवड होती. वयाच्या शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला.

वयाच्या ७७व्या वर्षी त्यांना शाळेत दाखल करण्यात आले. अशा परिस्थितीत जेव्हा ते पुन्हा शाळेत जाऊ लागले, तेव्हा त्यांनी शाळेत काळजीपूर्वक अभ्यास करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर ते घरी आल्यावरही अभ्यास करतात. त्यांची कहाणी त्यांच्या नातवाने ट्विटरवर शेअर केली आहे आणि सांगितले आहे की, त्याच्या आजोबांनी पुन्हा एकदा शाळेत प्रवेश घेतला आहे, कारण त्यांना अभ्यास करायचा होता. आता ते ८१ वर्षांचे असून, त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. ते दिवसातून अनेक तास अभ्यास करतात. शाळेतील त्यांचे वर्गमित्र लहान मुले आहेत, त्यांच्यावरही ते प्रेम करतात.
२८ नोव्हेंबर रोजी ट्विटरवर पोस्ट केलेल्या या कथेला हजारो लोकांनी लाइक केले. आतापर्यंत २७ हजार लोकांनी ती पाहिली आहे आणि अनेकांनी लाइकही केले आहे. या कथेवर भाष्य करताना त्यांनी खूप चांगल्या गोष्टीही सांगितल्या आहेत. एका युझरने लिहिले की, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की, आम्ही काय करू शकतो आणि किती शिकू शकतो. अनेकांनी याला हृदयस्पर्शी कथा म्हटले आहे. बहुतेक वापरकर्ते म्हणतात की, वाचायला आणि शिकण्यासाठी कधीही उशीर होत नाही आणि पुस्तके वाचण्यापेक्षा काहीही चांगले नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …