वयाच्या २१व्या वर्षी चौथ्यांदा गर्भवती

ज्या वयात मुली लग्नाचा विचार करू लागतात, त्या वयात एक अमेरिकन महिला ३ मुलांची आई बनली आहे आणि आता ती लवकरच चौथ्या मुलाला जन्म देणार आहे. ती लवकरच ख्रिसमसच्या आसपास बाळाला जन्म देणार असल्याचे तिने सोशल मीडियावर लोकांना सांगताच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. क्रिस्टा नावाच्या एका महिलेने तिला टिकटॉकवर अतिशय शानदारपणे सांगितले की, ती या ख्रिसमसमध्ये एका मुलाचे स्वागत करणार आहे, परंतु लोकांनी तिला खूपच वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली.
अनेकदा लोक त्यांच्या आयुष्यात आलेला कोणताही आनंद पहिल्यांदा सोशल मीडियावर शेअर करतात आणि ते जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. तथापि, कधीकधी असे केल्याने ते आनंदी होण्याऐवजी दु:खी होतात. असाच काहीसा प्रकार क्रिस्टा नावाच्या अमेरिकन आईसोबत घडला. जेव्हा तिने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली, तेव्हा लोकांनी तिला ट्रोल केले.

खरे तर क्रिस्टाचे वय अवघे २१ वर्षे आहे. ती आतापर्यंत ३ मुलांची आई बनली असून, ख्रिसमसच्या निमित्ताने चौथ्या मुलाच्या स्वागताची तयारी करत आहे. जेव्हा तिने टिकटॉकच्या माध्यमातून ही गोष्ट जगासमोर ठेवली, तेव्हा तिच्या आनंदात सहभागी होण्याऐवजी युझर्सनी तिला ट्रोल केले.
एका छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून २१ वर्षीय क्रिस्टाने लोकांना सांगितले की, ती ख्रिसमसला बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार आहे. हे सांगतानाच तिने लोकांना आपला बेबी बंपही दाखवला. अमेरिकन टिकटॉक स्टार क्रिस्टा अनेकदा तिच्या अकाऊंटवर आई-मुलाचे व्हिडीओ टाकते. त्यात ती तिच्या तीन मुलांसोबत दिसतेय. अशा परिस्थितीत, जेव्हा तिने तरुण वयात आपल्या चौथ्या गर्भधारणेबद्दल लोकांना सांगितले, तेव्हा तिला वाईटरित्या ट्रोल केले जाऊ लागले. या वयात इतकी मुले जन्माला आल्यावर लोकांनी विचित्र प्रतिक्रिया दिल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …