ठळक बातम्या

वयाच्या १७व्या वर्षी तरुणाचे वजन ६०० किलो होते; १२ वर्षांनंतर ओळखणे झाले कठीण

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वजनाची खूप काळजी असते, पण खूप कमी लोक असतात जे वजन वाढल्यानंतर वजन कमी करण्याचे मार्ग शोधतात आणि नंतर वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. कारण वजन वाढवणे जितके सोपे आहे, तितकेच ते कमी करणे कठीण आहे. असाच प्रकार सौदी अरेबियातील एका व्यक्तीच्या बाबतीत घडला. एक काळ होता, जेव्हा त्याला जगातील सर्वात वजनदार किशोर मानले जात होते, परंतु आता त्याला ओळखणे कठीण आहे.
खालेद मोहसेन अल शायरी हा सौदीच्या जार्झान शहरात राहतो. जेव्हा तो १७ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे वजन १००-२०० किलो नव्हते, तर ६०९ किलो होते! होय, खालिद खूप लठ्ठ होता, त्यामुळे त्याला चालताही येत नव्हते. त्याची तब्येत खूपच बिघडली होती आणि एवढ्या वजनामुळे त्याचा जीवही जाऊ शकतो.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, २०१३ मध्ये जेव्हा खालिदला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्याच्या घरातून बाहेर काढावे लागले, तेव्हा त्याच्या वजनामुळे त्याला दुसºया मजल्यावरून पायºयांवरून खाली उतरवणे अशक्य झाले होते. यामुळे खालिदला त्याच्या घरातील खोलीतून काढण्यासाठी आधी घराचा मोठा भाग पाडण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने त्याला बेडसह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्याला विमानाने उचलून रुग्णालयात नेण्यात आले. त्याआधी सुमारे अडीच वर्षे खालिदने खोली सोडली नव्हती.
त्यानंतर सौदीच्या आरोग्यमंत्र्यांनी मानवतावादी म्हणून खालिदला वाचवण्याचे आदेश दिले. इस्पिळात खालिदला ३० डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, जे त्याची काळजी घेत असत तसेच त्याच्याकडून व्यायामदेखील करवून घेत. शस्त्रक्रिया, व्यायाम आणि अनेक उपचारांद्वारे खालिदने चालायला सुरुवात केली आणि एकूण ५४६ किलो वजन कमी केले, तेव्हापासून खालिदशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याचे वजन कमी दिसत आहे. त्याचा नुकताच समोर आलेला फोटोही काही काळापूर्वीचा आहे, पण त्या चित्रात २९ वर्षीय खालिद पूर्णपणे बदललेला दिसत आहे. बातम्यांनुसार, २०१८ मध्ये वजन कमी केल्यानंतर, लटकलेली त्वचा देखील शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आली होती. आता त्याचे वजन ६३ किलो आहे आणि तो निरोगी आयुष्य जगत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …