वन मंथ ॲनिव्हर्सरी साजरी करण्याचा राज-पत्रलेखाचा नवा फंडा!

बॉलीवूड कलाकारांमध्ये यावर्षी अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री पत्रलेखा पॉल यांचा विवाहही चर्चेत राहिला. हे दोघे गेल्या महिन्यात चंदिगड येथे विवाहबंधनात अडकले. राजकुमार आणि पत्रलेखाने आपला हा विवाह सोहळा खूप प्रायव्हेट ठेवला होता. या दोघांच्या विवाहाला आता एक महिना झाला असून, या नवदाम्पत्याने एका महिन्याची ॲनिव्हर्सरीही खूप अनोख्या अंदाजात साजरी केली.
राजकुमार राव व पत्रलेखाने सोशल मीडियावर एकमेकांसोबत आपले फोटो शेअर करत आपल्या विवाहाची एक महिन्याची ॲनिव्हर्सरी साजरी केली. विवाहानंतर हे दोघेही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह दिसून येतायेत. राजकुमार रावने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी पत्रलेखासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या प्री वेडिंग पार्टीचा आहे. या फोटोत हे दोघे स्विमिंग पुलच्या बाजूला झोपलेले दिसून येतायेत. फोटोत हे दोघेही चिखलालने माखलेले व मस्ती करताना पाहायला मिळतायेत. या फोटोत पत्रलेखा ब्रालेटमध्ये आहे, तर राजकुमारने आपली शॉर्ट्स घातली आहे. तर दुसऱ्या फोटोत राजकुमार आणि पत्रलेखा वधूवराच्या रूपात पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करताना राजकुमारने पत्नी पत्रलेखाकरिता एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘मेरा यार तुम, मेरा प्यार तुम, मेरा दिल भी तुम, दिलदार तुम’ पोस्टमध्ये पत्रलेखाला टॅग करत राजकुमारने लिहिले, ‘एक महिना झाला आहे.’ तर पत्रलेखानेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर राजकुमार रावबरोबरचा आपल्या विवाहाचा एक फोटो शेअर करत एका महिन्याच्या विवाहाची ॲनिव्हर्सरी साजरी केली. सोशल मीडियावर या दोघांच्या फोटोंना खूप पसंती दर्शवली जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …