राजकोट – व्यंकटेश अय्यर विजय हजारेट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. शनिवारी उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात मध्य प्रदेशकडून खेळताना त्यानेअर्धशतकी खेळी साकारली आणि २ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्पर्धेच्या मागच्या दोन सामन्यांमध्ये अय्यरनेएक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने १८३ धावा केल्या आहेत, याशिवाय त्याने ५ गडीही बाद केले आहेत. टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळेटीमबाहेर शिवाय त्या बॅटमधून धावांचा ओघही अटला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अय्यरची वनडे टीममध्येनिवड होऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या या सामन्यात मध्य प्रदेशने पहिलेबॅटिंग करत ७ गड्याच्या मोबदल्यात ३३० धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या व्यंकटेश अय्यरने४९ चेंडूंमध्ये आक्रमक ७१ धावा केल्या . यामध्ये३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. याशिवाय सलामीवर अभिषेक भंडारीने१०६ आणि शुभम शर्माने७० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तराखंडला ९ गडी गमावत २५३ धावांपर्यंत च मजल मारता आली, त्यामुळे मध्य प्रदेशने हा सामना ७७ धावांनी जिंकला.
व्यंकटेश अय्यरनेया सामन्यात १० षटकांत ५८ धावा देत २ गडी बाद केले. याशिवाय पुनित दातेनेही ३ विकेट पटकावल्या. त्याआधी व्यंकटेश अय्यरने केरळविरुद्ध ११२ धावांची खेही साकारली होती. तसेच ३ विकेट मिळवल्या. महाराष्ट्राविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अय्यरने१४ धावा करत एक विकेटही घेतली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …