चंद्रपूर – देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. तर दुसरी कोरोना प्रतिबंधक नियम कडक केले जात असतानाच सत्तेत असलेल्या आणि महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य तसेच केंद्र सरकार अपयशी ठरल्याचेत्यांनी म्हटले आहे. तसेच लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोस घेत राहायचे का असा सवालही त्यांनी केला आहे. २ वर्षांच्या कालखंडात राज्य आणि केंद्रसरकारने कुठल्याच निश्चित उपाययोजना केल्या नाहीत, असे बाळू धानोरकर म्हणाले. तसेच त्यांनी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरदेखील टीका केली. यापूर्वी बाळू धानोरकर यांनी कालच ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची मागणी केली होती. सध्या राज्यातील सर्व पर्यटन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची मागणी केल्यामुळे धानोरकर चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांवरुन राज्य तसेच केंद्र सरकारला लक्ष्य केल्यामुळे त्यांची चर्चा होत आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …