ठळक बातम्या

लेस्बियन करवा चौथवाल्या ॲडवरील कंपनीच्या भूमिकेवर नाराज आहे पूजा भट्ट

गेल्या काही दिवसांपासून डाबर कंपनीद्वारे रिलीज करण्यात येत असलेल्या एका जाहिरातीवरून खूप मोठा बवाल झाला आहे. डाबरने आपल्या फ्लेम बीच प्रोडक्टच्या प्रचाराकरिता करवा चौथचे औचित्य साधून एक ॲड बनवली. ज्यात त्यांनी दोन मुलींना एकमेकींसाठी व्रत ठेवताना तसेच एकमेकींचे व्रत सोडवताना दाखवले होते. ही जाहिरात पाहून सामान्य लोकांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, एका नेत्यानेही लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल या जाहिरातीवर ताशेरे ओढले होते. या सर्व गदारोळामुळे डाबर कंपनीने माफी मागितली असून, ही जाहिरातही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवली आहे. मात्र फिल्ममेकर पूजा भट्टने डाबर कंपनीने घेतलेल्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पूजा भट्ट ही सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. त्याचबरोबर ती देशातील महत्त्वाच्या मुद्यांवर बेधडकपणे आपले मतही मांडताना पाहायला मिळते. अलीकडेच डाबरच्या लेस्बियन करवा चौथवाल्या ॲडवरून उडालेल्या गदारोळावर तसेच कंपनीने यासंदर्भात घेतलेल्या स्टॅँडवर प्रश्न उपस्थित केला आहे. पूजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून डाबर कंपनीवर आपल्याच जाहिरातीला सपोर्ट न केल्याबद्दल बोट ठेवले आहे. पूजा भट्टने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले आहे,’बस्स यही करते रहो…बहुत हुआ लोकतंत्र की मां बनना! डाबरसारख्या दिग्गज कंपनीने आपल्या ॲडच्या मागे ठाम पणे उभे राहण्यास नकार दिला आहे. जेव्हा की मी मूळ रूपात एका फेअरनेस क्रीमचे समर्थन नाही करत. मी आपले कमेंट सुरक्षित ठेवले आहेत कारण त्यांनी सर्वसमावेशकता आणि हॅशटॅग प्राईड साजरे करण्याचा प्रयत्न केला होता. मग आता का लपवत आहेत?
डाबरची ही जाहिरात पाहिल्यानंतर कंपनीला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने माफिनामाही जारी केला होता, परंतु लोकांनी तो स्वीकार न करता कंपनीचे प्रोडक्ट्स बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंपनीने गांभीर्य लक्षात घेत आणखी एक माफिनामा सादर केला व त्याचबरोबर सदर जाहिरातही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …