ठळक बातम्या

लेबनॉनच्या ज्युदो स्पर्धेला भारताला ४ रौप्य आणि ८ कांस्य पदके


पुणे – लेबनॉन येथे झालेल्या आशिया ओशेनिया ज्युदो स्पर्धेत भारतीय संघाने ४ रौप्य व ८कांस्य पदके पटकावून दमदार कामगिरी केली. हि स्पर्धा कॅडेट व ज्युनिअर या दोन वयोगटात खेळली गेली. भारताचा ३१ सदस्य असलेला संघ सहभागी झाला होता.ज्यात पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी येथे सराव करणारी श्रद्धा चोपडेहीचा समावेश होता, तर संघाचे प्रशिक्षक म्हणून पुण्यातील आतंरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री योगेश धाडवे यांनी काम केले.
स्पर्धेत उझबेकिस्तान संघाने कॅडेट गटात संघाने ९ सुवर्ण पदके मिळवून तर ज्युनिअर गटात ७ सुवर्णपदके मिळवून सांघिक विजेतेपद मिळवले. कझाकिस्तान संघाने कॅडेट गटात व ज्युनिअर गटात प्रत्येकी ३ सुवर्णपदके मिळवून उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेतील पदक विजेते खालीलप्रमाणे – कॅडेट गट- १) तंनू मान – ४८ किलो वजनी गट – रौप्यपदक, २) तनिष्ठा टोकस- ५२ किलो वजनी गट – कांस्यपदक, ३)लिंथोई -५७ किलो वजनी गट – कांस्यपदक, ४) नंदिनी वत्स- ७०किलो वजनी गट- कांस्यपदक, ५)अनुराग सागर-५० किलो वजनी गट – कांस्यपदक, ६) शीतल सिंग झ्र ८१ किलो वजनी गट – कांस्यपदक, ७) अनिल – ९० कि लो वजनी गट – कांस्यपदक
ज्युनिअर गट – १) यश घनगस १०० किलो वजनी गट – रौप्यपदक, २) लिंथोई- ५७ किलो वजनी गट – रौप्यपदक, ३) उन्नती शर्मा- ६३ किलो वजनी गट – रौप्यपदक, ४) रेबिना- ७० किलो वजनी गट झ्र कांस्यपदक, ५) इशरूप – ७० किलो वजनी गट – कांस्यपदक

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …