लेपर्ड प्रिंट ब्रालेटमधील मलाईकाने वाढवले इंटरनेटचे तापमान


बॉलीवूड ॲक्ट्रेस आणि डान्सर मलाईका अरोरा आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या बऱ्याच काळापासून मलाईका अर्जुन कपूर सोबतच्या रिलेशनशीपमुळे इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरली आहे. परंतु मलाईकाला जगाची बिल्कुल फिकीर नाहीयं. ती आपल्या जगात मश्गुल आहे. दुनियेची पर्वा न करता मलाईका अर्जुनबरोबर खास मोमेंट्स घालवताना नेहमीच दिसून येते. नुकतेच हे दोघे मालदीवमध्ये सुट्टी एंजॉय करताना दिसून आले. त्यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरलही झाले आहेत. परंतु आताच्या मलाईकाच्या एका फोटोशूटने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोतील मलाईकाचा बोल्ड लुक हा प्रत्येकालाच थक्क करुन सोडणारा आहे.
मलाईकाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या नव्या फोटोशूटचे काही फोटो टाकले आहेत. त्यात ती प्रचंड हॉट दिसत आहे. त्यावेळी मलाईकाने लेपर्ड प्रिंटेड ब्रालेट सोबत मॅचींग स्कर्ट घातलेला पहायला मिळत आहे. तर या आऊटफिट सोबत तिने गळ्यात एक हलके नेकपीस आणि कानात ईअररिंग्ज घातलेल्या दिसून येतात. आपला हा लुक अधिक आकर्षक दिसावा म्हणून मलाईकाने आपले केस मोकळे सोडले आहेत. या ड्रेससोबत तिने खूप लाईट मेकअप केला आहे. वयाच्या 48 व्या वर्षीही मलाईका भल्याभल्या अभिनेत्रींना बोल्डनेसच्या बाबतीत मात देताना दिसून येते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …