लुहान्स्क, डोनेत्स्कमध्ये घुसले रशियन सैनिक


मॉस्को – रशियन सैन्याने युक्रेनच्या लुहान्स्क, डोनेत्स्क (डॉनबॉस क्षेत्र) या दोन प्रांतात प्रवेश केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काही तासांपूर्वी युक्रेनच्या या दोन राज्यांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. यानंतर रशियन सैन्याचे रणगाडे या भागांकडे गेले. लुहान्स्क, डोनेत्स्क आणि फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील भागात शांतता राखणे आवश्यक असल्याचे पुतीन म्हणाले होते. यासंदर्भात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियाने उचललेल्या पावलांना घाबरत नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आम्ही कोणाकडून काही घेतले नाही आणि कोणाला काही देणार नाही. रशियाच्या घोषणा आणि धमक्यांना न जुमानता युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय सीमा पूर्वीप्रमाणेच राहतील, असे जेलेन्स्की म्हणाले. युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वतंत्र घोषित करण्याच्या पुतीनच्या हालचालीनंतरच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलावली.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …