लिएंडर पेसचा राजकारणात प्रवेश, तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

कोलकाता – प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसने राजकारणाची नवी इनिंग सुरू केली आहे. क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात दाखल झाला आहे. आपल्या या नव्या इनिंगसाठी त्याने तृणमूल काँग्रेसची निवड केली आहे. गोव्यामध्ये शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्याचे पक्षात स्वागत केले. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मी अतिशय आनंदी आहे. तो माझा लहान भाऊ आहे. मी जेव्हा युवा मंत्री होते, तेव्हा तो अतिशय तरुण होता. तेव्हापासून मी त्याला ओळखते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ३ दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. येत्या काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार असून, ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …