लारा-डेल स्टेन सनरायझर्स हैदराबाद संघाच्या प्रशिक्षकपदी

हैदराबाद – आयपीएलचे माजी विजेते सनरायझर्स हैदराबादने कोचिंग स्टाफमध्ये काही बदल केले आहेत. गुरुवारी त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. २००२ च्या आयपीएल सीझनसाठी सनरायझर्स हैदराबादने ब्रायन लारा आणि डेल स्टेनचा समावेश केला आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि प्रतिभावान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराची संघाच्या बॅटिंग कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचा तो सल्लागारही असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचा माजी डावखुरा फलंदाज हेमान बदानीची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिच सनरायझर्स हैदराबादचे सहाय्यक प्रशिक्षक असणार आहेत.
हेड कोच टॉम मुडी यांच्या नेतृत्वाखाली सपोर्ट स्टाफमधील सर्वजण काम करतील. मुरलीधरन फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. मागच्या वर्षी टॉम मुडी यांनी सनरायझर्स हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांची एनसीएच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संघाचे मार्गदर्शकपद सोडले. यावर्षीच्या आयपीएलमध्ये एसआरएचची कामगिरी खूपच निराशाजनक होती. कर्णधार केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादचा संघ तळाला होता. यावेळी हैदराबाद संघात अब्दुल समाद आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांचा समावेश करण्यात आला आहे.
ब्रायन लाराने कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतक आणि ४८ अधर्शतकांसह ११९५३ धावा काढल्या आहेत, तर वन-डेमध्ये त्याने १९ शतकांच्या जोरावर १०४०५ धावा काढल्या आहेत. त्याचप्रमाणे एका फर्स्ट क्लास इनिंगमध्ये ५०१ धावा करण्याचा विक्रमही लाराच्या नावावर आहे. लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या खेळींचे विक्रम असून त्यामध्ये इंग्लंड विरुद्ध ३७५ आणि ४०० या दोन खेळींचा समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …