- शिक्षण मंत्री उदय सामंतांचे ट्विट
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून इन्फोसिससोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून यासंबंधी माहिती दिली आहे. इन्फोसिससोबत सामंजस्य करार केल्याने राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ४० लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना इन्फोसिसच्या मदतीने कौशल्य आधारित अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे ४० लाख विद्यार्थ्यांना आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. कौशल्य आधारित आणि तांत्रिक शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत देण्यात येणार असल्याने राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही. इन्फोसिस या कंपनीने विविध विषयांवरील आणि विविध कालावधींचे ३ हजार ९०० पेक्षा अधिक ऑनलाइन कोर्सेस तयार केले आहेत. या कोर्सेसचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड या ऑनलाइन मंचावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इन्फोसिसने तयार केलेले अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत.
3 comments
Pingback: unicc
Pingback: blue magnolia rust mushroom
Pingback: hizeed