मुंबई – लहान मुलांवर जी चाचणी सुरू आहे, त्याचेही परिणाम चांगले येत आहेत, अशी माहिती सीएसआयआरचे संचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. या लसीचे परिणाम असेच राहिले, तर लवकरच मान्यता मिळेल यात शंका नाही. इतर देशांच्या तुलनेत आपण मागे आहोत, असेही नाही, असे ते म्हणाले. लवकरात लवकर लहान मुलांना लसीकरण करू शकलो, तर चांगली गोष्ट आहे; मात्र आपण यात मागे नाही, असे डॉ. शेखर मांडे यांनी म्हटले आहे. डॉ. मांडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. डॉ. मांडे यांनी म्हटले की, शंभर कोटी डोसचा पहिला टप्पा आपण पार केला आहे. आता पुढचे लक्ष्य २०० कोटी डोसचे आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत आपण ते पार करावे असे टार्गेट आहे, असे ते म्हणाले. त्यात बहुतांश लोकांचे दुसरे डोसही कव्हर होतील, असेही ते म्हणाले.
डॉ. शेखर मांडे यांनी म्हटले की, अजून काही लसींवर जोरात काम सुरू आहे. एमक्युअर नावाची कंपनी आहे. त्यांचेही पहिल्या फेजमधील रिझल्ट चांगले आहेत. लसीचे आपल्या देशात खूप चांगले काम सुरू आहे. कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी ही आनंदाचीच गोष्ट आहे.
मांडे यांनी म्हटले की, रशिया आणि ब्रिटनमध्ये केसेस वाढत आहेत; पण ब्रिटनमध्ये लसीकरण योग्य झालेले आहे. आकडे वाढत असतानाही मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. त्यांनी म्हटलं की, तिसऱ्या लाटेची शक्यता नेहमीच राहील. ती किती गंभीर असेल हे सांगता येत नाही. दरवर्षी ही लाट येत राहील; पण त्याचा प्रभाव लसीकरणामुळे कमी होईल, असे डॉ. मांडे म्हणाले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …