देशात कोरोना टीकाकरण अभियान चालु आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिल्याचे वृत्त आले होते. मात्र आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) लसीच्या वापरासाठी मान्यता दिली नसल्याचे सांगितले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अधिकृत सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
“मूल्यमापन अद्याप सुरू आहे. काही गोंधळ आहे आणि तज्ज्ञ समितीशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) त्याला मान्यता दिलेली नाही.” अशी मीहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.