लहान मुलांचे लसीकरण : आजपासून मुंबईतील लसीकरण केंद्र सज्ज

मुंबई – आजपासून १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून कोविन अ­ॅपवर नोंदणी सुरू झाली असून, चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रासह मुंबईतील लसीकरण केंद्र ही लहान मुलांच्या लसीकरणासाठी सज्ज आहेत. महापालिका शिक्षण विभागाकडून पालिकेतील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष सोय करण्यात आली आहे, तसेच मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील तयारी पूर्णपणे झाली आहे.

सोमवारपासून मुंबईमध्ये ९ लसीकरण केंद्रांवर लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. सुरुवातीला मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. तशाप्रकारची सोय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केली आहे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बसमधून लसीकरण केंद्रावर आणले जाईल, तसेच लसीकरण झाल्यानंतर पुन्हा शाळेत सोडले जाणार आहे. शिवाय इतर खासगी शाळांमधील विद्यार्थीही ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून किंवा वॉक इन लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दोन दिवसांपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची खबरदारी विद्यार्थी, पालकांनी घ्यायची आहे. लसीकरण केंद्रावर एखाद्या मुलाला त्रास होत असेल, त्याच्या उपचारासाठी लसीकरण केंद्रावर पीडियाट्रिक वॉर्डसुद्धा तयार करण्यात आला आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …