ठळक बातम्या

 लष्करप्रमुख मनोज नरवणे नवे सीडीएस?

नवी दिल्ली – देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. संपूर्ण भारतीय लष्कराची कमान ते सांभाळत होते, पण त्यांच्या निधनाने आता सीडीएस पद रिकामे झाले आहे. सीडीएससारखे सर्वोच्च पद हे फार काळ रिकामे ठेवता येणार नाही. त्यातही चीन आणि पाकिस्तानच्या ज्या कुरापती सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर तर नाहीच नाही. त्यामुळेच जनरल रावत यांच्या निधनानंतर आता नवे सीडीएस कोण होणार?, याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यासाठी एकमेव आणि आघाडीवरचे नाव आहे, सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे.
सध्यस्थितीत जनरल एम. एम. नरवणे हेच देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत. त्यातही जनरल रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून जे काही प्रकल्प सुरू केले आहेत, जी कामे हाती घेतली आहेत, त्याची माहिती आणि अनुभव हा सर्वाधिक जनरल नरवणेंनाच आहे. कारण नरवणे हे सध्याचे लष्करप्रमुख आहेत. सध्याचे वायूदल प्रमुख व्ही. आर. चौधरी हे सुद्धा मराठीच आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेडमध्ये झालेले आहे. त्यांनी अलीकडेच इंडियन एअरफोर्सची जबाबदारी हाती घेतली आहे, तर नौदलप्रमुख असलेल्या आर. हरीकुमार यांनीही ३० नोव्हेंबरला सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळेच सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणेंकडे जी पात्रता, जो अनुभव आहे तो इतरांकडे नाही. त्यामुळेच जनरल नरवणेंचे नाव सीडीएस पदासाठी आघाडीवर आहे.
जनरल नरवणे यांचा लष्करप्रमुख म्हणून कार्यकाळ पुढील वर्षी एप्रिलमध्ये संपत आहे. लष्करी नियमानुसार सीडीएसला ६५ वर्षे वयापर्यंत त्या पदावर राहता येते. तर इतर तीनही सैन्यदल प्रमुखांना वयाच्या ६२ वर्षांपर्यंत त्या पदावर राहता येते किंवा तीनच वर्षे त्या पदावर राहण्याची अट आहे. त्यानंतर मात्र ते निवृत्त होतात. जनरल नरवणे निवृत्त झाल्यानंतर सीडीएस पदावर राहण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करतात. त्यामुळेच सीडीएस पदाचे फ्रंटरनर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …