ठळक बातम्या

लष्करप्रमुख नरवणेंना मिळाली तिन्ही दलांच्या चीफ आॅफ स्टाफ कमिटीची जबाबदारी

बिपीन रावतांच्या निधनानंतर मोठा निर्णय
नवी दिल्ली – लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी चीफ आॅफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यांना देशाचे नवे चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ बनवले जाईल, असे अंदाज बांधले जात होते, परंतु यादरम्यान बुधवारी त्यांच्याकडे सीओएससीचे पद सोपवण्यात आले. ८ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात देशातील पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अकाली निधनानंतर तिन्ही सेवांच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या समितीचे अध्यक्षपद रिक्त होते.
नवीन सीडीएसबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले, परंतु जनरल नरवणे हे तिन्ही सेवेतील सर्वात वरिष्ठ प्रमुख असल्यामुळे सीओएससीचे अध्यक्ष बनले आहेत आणि त्यामुळे पुढील सीडीएस होण्याचा त्यांचा दावा बळकट झाला आहे.
आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी ३० सप्टेंबरला, तर नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांनी ३० नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. याउलट जनरल नरवणे यांना लष्करप्रमुख होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत. ६१ वर्षीय जनरल नरवणे यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता.
सीओएससी ही तीन सेवांच्या प्रमुखांचा समावेश असलेली एक समिती आहे, जी तीन सेवांमध्ये आॅपरेशन्स आणि इतर समस्यांबाबत समन्वय राखण्यासाठी काम करते. सीडीएस पद निर्माण होण्यापूर्वी जी परंपरा होती, त्याच जुन्या परंपरेनुसार जनरल नरवणे यांना सीओएससीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. या परंपरेनुसार, तिन्ही सेवांच्या प्रमुखांपैकी सर्वात वरिष्ठ अधिकाºयाची सीओएससीचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात येत होती.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …