मुंबई – मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसवर सुरु करण्यात आलेल्या रेस्टॉरंट ऑन व्हील योजनेला पर्यटक आणि मुंबईकरांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता सीएसएमटीनंतर मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरु करण्याचा तयारी आहे. या रेस्टॉरंटकरिता रेल्वेने एक कोच सुद्धा तयार केला आहे. हा कोच लवकरच एलटीटी स्थानकात दाखल होणार आहे.
मुंबई आणि उपनगरतील रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असले तरी बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असे रेस्टॉरंट नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांना रेल्वे हद्दीतच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नही मिळेल, या उद्देशाने भारतीय रेल्वेने ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ ही संकल्पना सुरू केली आहे. मध्य रेल्वेने ही संकल्पना उचलून धरत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १८ नंबर प्लॅटफॉमर्बाहेर रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु केले आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे डब्यात तयार केले आहे. यामध्ये ४० जणांना बसण्याची सोय आहे. येथे प्रवासी, पर्यटकांना व्हेज आणि नान व्हेज दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येतो. रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु झाल्यापासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यत १० हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थांची चव चाखली आहे. नागरिकांचा प्रतिसाद बघता मध्य रेल्वेने दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील लोकमान्य टिळक टर्मिनसवर सुरु करण्याच्या तयारीत लागली आहे. रेल्वेकडून रेस्टॉरंटसाठी वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्याचे रंग-रंगोटीचे काम सुरु केले आहे. लवकरच हा रेल्वेचा कोच लोकमान्य टिळक टर्मिनसवर आण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीएसएमटी स्थानकांनतर आता एलटीटी स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु करण्याचा तयारीत मध्य रेल्वे लागली आहे. येत्या दोन महिन्यात या रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. त्यानंतर मध्य रेल्वे कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी स्थानकातही रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबविण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार या स्थानकात जुन्या कोचचे रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात येणार आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …