लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर – उषा मंगेशकरांची माहिती

मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उषा मंगेशकर यांनी दिली आहे. उषा मंगेशकर पुढे म्हणाल्या, दीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्या लोकांसोबत बोलू शकतात, पण डॉक्टरांनी त्यांना लोकांबरोबर बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, लता मंगेशकरांना घरातील कर्मर्चा­यामार्फत कोरोनाची लागण झाली आहे. उषा मंगेशकरदेखील याला दुजोरा दिला आहे.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत. लता दिदींना कोविड न्युमोनिया झाला आहे. दिदी सध्या आयसीयूमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना पुढील ७ ते ८ दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे.
दरम्यान, लता मंगेशकरांना घरातील कर्मर्चा­यामार्फत कोरोनाची लागण झाली आहे. उषा मंगेशकरदेखील याला दुजोरा देत म्हणाल्या, दीदींच्या खोलीची साफसफाई करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच लता दीदींनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …