ठळक बातम्या

‘लडकी हूँ लड सकती हूँ’

‘लडकी हूँ लड सकती हूँ’

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून ४० टक्के महिला उमेदवार
सर्वच पक्षांनी महिलांना संधी द्यावी

काँग्रेस जमिनीवर आहे, लढत आहे
प्रियंका गांधींची घोषणा

लखनऊ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रियंका गांधी काँग्रेसकडून रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील महिलांना राजकारणात येण्यासाठी आवाहन केले आहे, तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली. मंगळवारी लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ही पत्रकार परिषद देश आणि उत्तर प्रदेशच्या महिलांना समर्पित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘लडकी हूँ लड सकती हूँ’, हा नारा यावेळी त्यांनी दिला.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, महिलांना तिकीट जातीच्या आधारावर नाही तर पात्रतेच्या आधारावर दिले जाईल. आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू. जर तुम्ही या वेळी मजबूत नसलात तर पुढच्या वेळी तुम्ही मजबूत व्हाल. २०२४ मध्ये यापेक्षा जास्त महिलांना संधी मिळू शकते. माझ्या हातात असते तर ५० टक्के तिकीट महिलांना दिले असते. यामागे मुख्य कारण म्हणजे ज्या महिला एकत्रितपणे एक शक्ती बनून लढत नाहीत. त्या महिलांना जाती धर्मात विभागले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पत्रकार, शिक्षिका, विविध क्षेत्रातील महिलांनी यावेअसे आवाहनही केले.

प्रियंका म्हणाल्या, हा निर्णय सर्व महिलांसाठी आह. उत्तर प्रदेशमध्ये बदलाचे स्वप्न पूर्ण होईल. देशाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचं आहे. सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावे. महिलांनी स्वत:चे रक्षण करावे. माझा निर्णय उत्तर प्रदेशच्या प्रत्येक महिलेसाठी आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी त्या लोकांसाठी लढत आहे जे आवाज उठवू शकत नाहीत. आवाज उठवणाºयांना चिरडले जात आहे. माझे राजकारण परिस्थिती बदलणे आहे. आज उत्तर प्रदेशात हत्या आणि चिरडण्याचे राजकारण होत आहे. उत्तर प्रदेशात चौथ्या क्रमांकावर असलो तरी आम्ही जमिनीवर आहोत. आम्ही लढत आहोत. काँग्रेस लढत असल्यामुळेच पर्याय देऊ शकतो. महिलांनी केवळ काँग्रेसमध्येच नाही तर भाजपमध्येही पुढे आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *