लग्नापूर्वी वधू होणाºया मुलीची विशेष काळजी घेतली जाते. तिच्या सौंदर्यापासून ते खाण्यापर्यंतही काळजी घेतली जाते. याचे कारण म्हणजे वधू तिच्या लग्नाच्या दिवशी वेगळी आणि सुंदर दिसते; पण जगात अशीही एक जागा आहे, जिथे लग्नाआधी वधूला चिखल फासतात आणि तिला माती, घाण, चिखल याची अंघोळ घालण्यात येते. या परंपरेबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल.
उत्तर पश्चिम स्कॉटलंडच्या काही ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून एक प्रथा सुरू आहे. येथे लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी वधूला चिखल फासला जातो. या प्रथेला ब्लॅकनिंग द ब्राइड म्हणतात. लग्नाआधी वधू वरावर टाकलेली घाण वधू आणि वर दोघांवर टाकली जाते. ही प्रथा येथे अनेक ठिकाणी आयोजित केली जाते, परंतु यात विशेषत: वधूला लक्ष्य केले जाते. या मागचे कारण काय आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतो.
येथील लोकांचा असा विश्वास आहे की, वधूवर शुभाशुभासाठी वधूला काळे फासल्यानंतर आणि तिला घाणेरड्या वस्तूंनी आंघोळ केल्यावर तिचे नशीब उजळेल आणि तिचे वैवाहिक जीवन सुखी होईल. या प्रथेमध्ये काळा रंग, शाई, माती, अंडी, कुजलेले अन्न आणि इतर अनेक घाणेरड्या गोष्टी वधूवर फेकल्या जातात. मान्यतेनुसार, वधू-वरांचे जीवन आनंदी राहावे, म्हणून असे केले जाते. यासोबतच त्यांना वैवाहिक जीवनात येणाºया संकटांना तोंड देण्याचे बळ मिळावे. याद्वारे वधूला सांगितले जाते की, लग्न हे गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या पलंगाइतके आरामदायी नसते, त्यात अनेक समस्या असतात, त्यामुळे त्याचा खंबीरपणे सामना केला पाहिजे.
एबरडीन विद्यापीठाच्या डॉ. शेला यंग यांनी यावर संशोधन केले, त्यानंतर त्यांनी याची सुरुवात कशी झाली ते सांगितले. त्यांनी सांगितले की, याची सुरुवात १९व्या शतकात लग्नापूर्वी महिलांचे पाय स्वच्छ करून झाली. मग चिमणीतून बाहेर पडणारी काजळी पायाला घासून मग स्वच्छ केली जायची. २०व्या शतकापर्यंत, ही एक मजेदार प्रथा बनली आणि वधू आणि वराचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्यात सामील होऊ लागले. त्यावेळी हे विशेषत: उन्हाळ्यात लग्न करणाºया जोडप्यांसाठी केले जात असे. हळूहळू ही प्रथा विस्तारत गेली. आता ते स्कॉटलंडच्या काही भागात सुरू आहे.