लग्नाआधीचे आजार लपवणे धोका : असे असलेतर लग्न होऊ शकते रद्द – दिल्ली हायकोर्ट

नवी दिल्ली – भारतीय समाजव्यवस्थेत विवाहसंस्थेचं महत्व अधिक आहे. विश्वास हा पती-पत्नीच्या नात्याचा कणा मानला जातो. जर विश्वासघात केला किंवा धोका दिला तर नात्याला ग्रहण लागलंच म्हणून समजा. अशात आता दिल्ली हायकोर्टानेएक महत्वाचा निकाल दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने एका प्रकरणात निकाल सुनावताना म्हटले आहे की, विविहपूर्वीपती किंवा पत्नीकडून त्यांना असलेल्या आजाराबद्दल माहिती न देणेधोका आहे. आणि असे असेल तर हे लग्न रद्द होऊ शकते, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने कौटुंबिक न्यायालयाचा एक आदेश रद्द करत एका व्यक्तिचेलग्न रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठानेहे विविह रद्द करत म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीची चूक नसेल तर कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ शकतो.
कोर्टानं म्हटले आहे की, या प्रकरणातील महिलेने मान्य केले आहे की, तिला कॉलेज वयापासून डोकेदु:खीचा त्रास होता, त्यामुळं तिचे शिक्षण बंद झाले. खंडपीठाने असेही म्हटले की, डोकेदु:खी मोठा आजार नाही. हे केवळ एखाद्या आजाराचेलक्षण आहे. मात्र महिलेने हे सांगितलं नाही की, तिला गंभीर आणि सततची डोकेदुखी होती. त्यामुळं तिला शिक्षण सोडावं लागलं. कोर्टानं म्हटलं आहे की, मानसिक आजारानं पीडित असलेल्या व्यक्तिच्या मुलांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. लग्नाच्या जवळपास ९ आठवड्यानंतर या महिलेच्या वडिलांनी तिला आपल्या घरी नेले होते. या सर्व प्रकरणात दुर्देवी पद्धतीने पतीचे आयुष्य त्रासदायक झाले. तो नाहक गेल्या १६ वर्षांपासून या नात्यात अडकून पडला आहे. जीवनाच्या सर्वात महत्वाच्या काळात याचिकाकर्त्याला वैवाहिक आनंद मिळू शकला नाही. महिलेच्या हट्टापायी त्याला त्रास सोसावा लागला यामुळं कोर्टानं सदर महिलेला १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …